अमेरिकेचे १७५ अब्ज डॉलरचे ‘गोल्डन डोम’ ;अंतराळातून देखरेख अन् AI द्वारे नियंत्रण, चीनचे वाढले टेन्शन

US Golden Dome System । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेमुळे चीनचे टेन्शन वाढल्याचे दिसत आहे. कारण काल डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्डन डोम’ ही नवीन आणि महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली तयार करण्याची घोषणा केली. या प्रणालीचा उद्देश उपग्रहाद्वारे हवेत शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा जलद शोध घेणे, त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांचा नाश करणे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘गोल्डन डोम प्लॅन’साठी $25 अब्जचे प्रारंभिक बजेट निश्चित केले आहे. तसेच, संपूर्ण प्रणाली बांधण्यासाठी सुमारे $१७५ अब्ज खर्च येणार आहे. त्याचे संपूर्ण बांधकाम अमेरिकेत केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘गोल्डन डोम’ प्रकल्पाबद्दल बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, “माझ्या कार्यकाळाच्या अखेरीस हा प्रोजेक्ट पूर्णत्वास येणार आहे.” असे म्हटले. ट्रम्प प्रशासनाने जनरल मायकेल ग्वेटलिन यांच्याकडे गोल्डन डोम प्रकल्पाची जबाबदारी सोपवली आहे. हे इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ प्रणालीपासून प्रेरित आहे, परंतु त्याची व्याप्ती खूप मोठी आणि अवकाश आधारित आहे. यामध्ये शेकडो पाळत ठेवणाऱ्या उपग्रहांचे नेटवर्क समाविष्ट असेल. प्रक्षेपणानंतर लगेचच क्षेपणास्त्रे नष्ट करण्यासाठी हे उपग्रह उपयुक्त ठरतील. हे रिअल टाइम डेटा शेअरिंग आणि रडार इंटेलिजेंसने सुसज्ज असतील. याशिवाय, त्यात एआय आधारित ट्रॅकिंग आणि फायर कमांडचा समावेश असेल. ही प्रणाली अमेरिकेच्या संरक्षण रणनीतीमध्ये अवकाश-आधारित संरक्षणाची पहिली ओळ असेल.
President Trump announced the Golden Dome missile defense shield to protect the homeland from advanced missile threats.
Included in the One, Big, Beautiful Bill, this project aims to ensure American security. Congress must pass the bill and send it to the President’s desk. pic.twitter.com/U0gwZ9DNnV
— The White House (@WhiteHouse) May 21, 2025
कॅनेडियन सहभाग आणि आंतरराष्ट्रीय परिमाण US Golden Dome System ।
ट्रम्प यांनी जाहीर केले की कॅनडाने गोल्डन डोम प्रकल्पात रस दाखवला आहे आणि अमेरिका त्याच्या उत्तरेकडील शेजाऱ्याला मदत करण्यास तयार आहे. अमेरिका हा प्रकल्प फक्त देशांतर्गत सुरक्षेपुरता मर्यादित ठेवू इच्छित नाही. यामुळे नाटो देशांसोबत भागीदारीसाठी नवीन दरवाजे उघडू शकतात. चीन आणि रशियासारख्या देशांसाठीही हा एक राजकीय संदेश आहे. जनरल मायकेल ग्वेटलिन यांची या प्रणालीचे संचालक आणि पर्यवेक्षक कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पेंटागॉनने आधीच सुरू केले काम US Golden Dome System ।
पेंटागॉनने आधीच सेन्सर, उपग्रह आणि क्षेपणास्त्र चाचण्यांची योजना आखली आहे. बजेट मंजुरीसह, बांधकामाचा प्रारंभिक टप्पा सुरू आहे. गोल्डन डोम प्रकल्प ट्रम्प यांनी निवडणूक आश्वासन म्हणून सादर केला होता, जो आता धोरणात रूपांतरित झाला आहे. त्याच्या मदतीने, अमेरिका आयसीबीएम, हायपरसॉनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचे रिअल टाइम ट्रॅकिंग आणि प्रतिसाद देऊ शकेल. अमेरिकेला अवकाशातील वर्चस्वात आघाडी मिळेल. एक संवेदनशील प्रणाली असूनही, ती एक उच्च-सुरक्षा संरक्षण प्रणाली असल्याचे सिद्ध होईल.





