“इथे येऊन चोऱ्या-चपाट्या केल्या तर…” ; व्हिसा नियमांबाबत भारतीयांना अमेरिकेकडून कडक इशारा

US Embassy। “जर कोणी अमेरिकेत हल्ला, चोरी किंवा घरफोडी केली तर त्याचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो आणि असे करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा कधीही अमेरिकेत प्रवेश मिळू शकणार नाही” असा भारतातील अमेरिकन दूतावासाने व्हिसा संबंधी कडक इशारा दिला आहे. अमेरिकेतील इलिनॉय शहरातील एका दुकानातून १.१ लाख रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्याच्या घटनेनंतर अमेरिकन दूतावासाने ही सूचना जारी केली आहे. या प्रकरणात एका भारतीय महिलेला अटक करण्यात आली.
अमेरिकन दूतावासाने सोशल मीडियावर अॅडव्हायजरी जारी केली आहे. अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती अमेरिकेत दरोड्यासारख्या कृत्यांमध्ये सहभागी आढळली तर त्याचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतोच, परंतु त्याला पुन्हा अमेरिकेचा व्हिसा न मिळण्याचीही शक्यता आहे. त्याला व्हिसासाठी अपात्र घोषित केले जाऊ शकते आणि त्याला पुन्हा अमेरिकेत प्रवेश करण्यास मनाई केली जाऊ शकते. ” असे त्यांनी म्हटले आहे. दूतावासाने परदेशी पर्यटकांना अमेरिकेच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले. US Embassy।
दूतावासाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘अमेरिकेत घरावर हल्ला करणे, चोरी करणे किंवा तोडफोड करणे यामुळे केवळ कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात.’ तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो आणि तुम्ही पुन्हा व्हिसासाठी अर्ज करण्यास अपात्र ठरू शकता. अमेरिका कायदा आणि व्यवस्थेला महत्त्व देते आणि परदेशी पर्यटकांनी अमेरिकन कायद्यांचे पालन करावे अशी अपेक्षा करते.”असेही म्हटले गेले आहे.
यूएस फेडरल लेजिस्लेटिव्ह इन्फॉर्मेशनच्या अधिकृत वेबसाइटवर,”वस्तू चोरी करण्यासारख्या कृत्यांमुळे देशातील अनेक कायद्यांचे उल्लंघन होते. हे संघीय गुन्हेगारी कायद्यांचे उल्लंघन देखील असू शकते.”
१ मे रोजी एका भारतीय महिलेने इलिनॉयमधील टार्गेट स्टोअरमध्ये सात तास फिरून १३०० डॉलर्स (१.१ लाख रुपये) किमतीचे सामान उचलले आणि बिल न भरता दुकानातून चोरले होते. टार्गेटच्या एका कर्मचाऱ्याने महिलेला थांबवले, त्यानंतर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. US Embassy।
यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करताना, कॅप्शनमध्ये घटनेची ही माहिती देण्यात आली आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनीही व्हिडिओबाबत घटनेबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही या महिलेला दुकानात पाहिले आणि ती तिथे सात तास होती.’ ती वस्तू उचलत होती, तिचा फोन पाहत होती आणि दुकानात फिरत होती. त्यानंतर तिने पैसे न देता दुकान सोडण्याचा प्रयत्न केला. पोलीसही दुकानात पोहोचले, त्यानंतर महिलेने सामानाचे पैसे देऊन पोलिसांशी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तिला हातकडी लावून घेऊन गेले.





