चीन अमेरिकेला म्हणाले,’…तर युद्ध करा’ ; “आम्ही नेहमीच तयार” म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा पलटवार

US-China Tariff War। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यापासून रोजच नवीन गोष्टी घडताना दिसून येत आहेत. सत्तेत असल्यापासून त्यांनी जगाला धडकी भरवणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काल डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदीय सभागृहाला संबोधित करताना जगातील देशांवर कर लावण्याची घोषणा केली. यामध्ये त्यांनी भारत आणि चीनवर रेसीप्रोकोल टेरिफ लावणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, अमेरिकेच्या या घोषणेमुळे चीनचा संताप झाला असून त्यांनी अमेरिकेला व्यापार युद्ध करण्यास म्हटले आहे. तर चीनच्या या इशाऱ्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही कधीही युद्धासाठी तयार आहोत असे म्हटले आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एका निवेदनात, अमेरिका चीनसोबतच्या टॅरिफ धोक्यांना आणि व्यापार युद्धाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही देशांमधील गेल्या काही काळापासून सुरू असलेला व्यापारी तणाव आणखी वाढला असल्याचे दिसत आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, हेगसेथ यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांना शांतता हवी आहे त्यांनी युद्धासाठी तयार राहावे. व्यापार वादाच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे. जिथे चीन आणि अमेरिकेतील टॅरिफ धमक्या आणि व्यापार निर्बंधांवरून संघर्ष सुरूच आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार, अमेरिका शांतता आणि सहकार्याकडे पुढे जाऊ इच्छिते, परंतु आवश्यक असल्यास, अमेरिका आपल्या हितांचे रक्षण करण्यास तयार असेल.”असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका-चीन व्यापार युद्ध US-China Tariff War।
ट्रम्प प्रशासनाने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २० टक्के कर लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी वाद आणखी वाढला. अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि अमेरिकन उत्पादकांचे संरक्षण करणे या उद्देशाने चीनच्या आर्थिक धोरणे आणि व्यापार पद्धतींविरुद्ध हे पाऊल उचलण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून, चीनने अमेरिकेतून येणाऱ्या निर्यात वस्तूंवरील शुल्क वाढवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संघर्ष आणखी वाढला.
शांतता आणि युद्धाची तयारी यांच्यातील संतुलन
पीट हेगसेथ यांच्या या विधानाचा उद्देश स्पष्ट आहे की, अमेरिका शांतता राखू इच्छिते, परंतु कोणत्याही संभाव्य संघर्षासाठी देखील तयार आहे. या धोरणाकडे एक प्रकारची राजनयिकता म्हणून पाहिले जाऊ शकते, ज्यामध्ये युद्धाची तयारी करण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.
अमेरिकेचे संरक्षण धोरण आणि शुल्क US-China Tariff War।
टॅरिफ वॉर हा केवळ आर्थिक मुद्दा नाही तर तो अमेरिकेच्या सुरक्षेचा आणि जागतिक प्रभावाचाही प्रश्न आहे. हेगसेथ यांनी स्पष्ट केले आहे की, आर्थिक धोरणांसोबतच अमेरिका आपल्या संरक्षण तयारीवरही भर देत आहे, जेणेकरून कोणत्याही संकटाच्या वेळी ते चीनविरुद्ध मजबूतपणे उभे राहू शकतील.





