US- China Tariff। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकन वस्तूंवरील शुल्क २४ टक्क्यांनी कमी केले आहे. जिनपिंग यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि शी यांच्यातील बैठकीनंतर दोन्ही देशांमधील सुरू असलेले मतभेद दूर झाल्याचे दिसून येत आहे. बैठकीनंतर लगेचच जिनपिंग यांनी घोषणा केली. त्यांनी घोषणा करताना,” चीन अमेरिकन सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करेल” असे ,म्हटले होते. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकन वस्तूंवरील २४ टक्के शुल्क एका वर्षासाठी कमी केले आहे, परंतु १० टक्के शुल्क कायम राहील. चीन १० नोव्हेंबरपासून काही अमेरिकन कृषी उत्पादनांवरील १५ टक्के शुल्क देखील कमी करेल. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठकीनंतर बीजिंगचा हा निर्णय आला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून मतभेद आहेत. मात्र, आता संबंधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. चीन-अमेरिकेत दीर्घकाळापासून सुरू असलेले शुल्क युद्ध US- China Tariff। जिनपिंग आणि ट्रम्प यांची दक्षिण कोरियातील बुसान येथे भेट झाली. या बैठकीनंतर लगेचच ट्रम्पने चीनवरील १० टक्के शुल्क कमी केले. त्यांनी चीनवरील ५७ टक्के शुल्क ४७ टक्क्यांपर्यंत कमी केले. टॅरिफ वॉरमुळे चीनने अमेरिकन सोयाबीन खरेदी करणे थांबवले होते, ज्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, नंतर चीनने सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. ट्रम्पनेही भारताबाबत मऊ भूमिका स्वीकारली US- China Tariff। अमेरिकेने चीनसोबत भारतावरही ५० टक्के कर लादला होता. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प भारतावर नाराज आहेत, म्हणूनच त्यांनी हे कर लादले. परंतू, आता ते भारताबाबतही मऊ भूमिका घेत असल्याचे दिसून येते. त्यांनी भारतासोबत व्यापार कराराची घोषणा केली.