कॅनडा, अमेरिकेतील विमानतळ हॅक ; स्क्रीनवर सुरु झालेल्या ‘या’ व्हिडीओमुळे सगळ्यांनाच भरली धडकी

US Canada Airport । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांनंतर, इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार झाला होता, परंतु आता सध्या तरी हमास ट्रम्पसाठी डोकेदुखी बनणार असल्याचे दिसत आहे. हमासबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की हमासने अमेरिका आणि कॅनडातील काही विमानतळ हॅक केले आणि नंतर विमानतळाच्या स्क्रीनवर धमकीचे व्हिडिओ प्ले केले.
मंगळवारी (१४ ऑक्टोबर) अमेरिका आणि कॅनडातील अनेक विमानतळांवर विचित्र घटना घडल्या. पेनसिल्व्हेनियातील हॅरिसबर्ग विमानतळ आणि ब्रिटिश कोलंबियातील केलोना विमानतळावर अचानक “हमास झिंदाबाद” आणि “फ्री पॅलेस्टाईन” च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. विमानतळाच्या स्पीकर्समधून हे आवाज येत होते. शिवाय, विमानतळाच्या स्क्रीनवर धमकीचे संदेश येऊ लागले.
Dear @realDonaldTrump,
Canada’s Kelowna airport had a serious security breach. Hacked with Hаmаs propaganda.
Mark Carney won’t stand up to the Muslim Brotherhood, but will stand up for them.
🇨🇦 is a security threat to the world.
Thank you for your attention to this matter. pic.twitter.com/hm0DyMd3Nx
— dahlia kurtz ✡︎ דליה קורץ (@DahliaKurtz) October 15, 2025
संपूर्ण प्रकरण काय आहे? US Canada Airport ।
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना हॅकिंगशी संबंधित आहे. हॅरिसबर्ग विमानतळाचे प्रवक्ते स्कॉट मिलर यांनी सांगितले की एका अज्ञात वापरकर्त्याने विमानतळ प्रणाली हॅक केली आणि धमकीचे संदेश प्ले केले. खबरदारी म्हणून ही प्रणाली ताबडतोब बंद करण्यात आली. या घटनेनंतर, अमेरिका आणि कॅनडाच्या सायबर सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
डोनाल्ड ट्रम्पसाठी आव्हान US Canada Airport ।
ट्रम्प यांनी अलिकडेच इस्रायल आणि हमास यांच्यात करार केला होता, परंतु आता हमास समर्थकांनी अमेरिकेच्या स्वतःच्या सायबर सुरक्षेचे उल्लंघन केले आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी हमासला कडक संदेशही दिला. त्यांनी ट्रुथआउट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की जर हमासने हिंसाचाराचा मार्ग सोडला नाही तर अमेरिका कारवाई करेल.





