उर्वशी रौतेलाचा मजेशीर डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Actress Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या स्टाईलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिचे कान्सच्या रेड कार्पेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या कान्समधील लूकला चांगलीच पसंती मिळाली होती. आता उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ज्यामध्ये ती मजेशीर पद्धतीने डान्स करताना दिसत आहे.
उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक डान्स मजेशीर डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी खूप आनंदी दिसत आहे. तिने ब्राऊन रंगाचा स्लिट ड्रेस परिधान केलेला आहे. या लूकमध्ये उर्वशी खूपच हॉट दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की उर्वशी प्रथम खूप नाचते आणि नंतर अचानक कोणीतरी तिच्यावर पाणी ओतते.
View this post on Instagram
या व्हिडिओवर तिने ‘मोनाकोमधील सुट्ट्या…’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उर्वशीच्या या व्हिडिओवर अनेक युजर्स आपले मत शेअर करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘तू डान्स करण्यात एक्सपर्ट आहेस’. दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘उर्वशी हे फक्त एक नाव नाही तर कृपेचा वंश आहे.’, दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘मोनाकोमध्ये गाऊन घालून पूलसाईड डान्स करणारी पहिली अभिनेत्री.
हेही वाचा: “तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा…”; अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट





