“तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा…”; अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट

Nivedita Saraf | ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची एक वेळी छाप निर्माण केली आहे. मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेजगतामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कलाकारांच्या यादीत अशोक सराफ यांचे नाव घेतले जाते.
काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांना भारत सरकारकडून पद्मश्रीने सन्मान करण्यात आले. यानंतर अशोक सराफ यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांचे कौतुक करत इनस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘तुला पती म्हणून लाभणं हीच माझी मोठी भाग्याची गोष्ट आहे… तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा मी एक भाग आहे, याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. तू एक महान मुलगा, भाऊ, पती आणि वडील आहेस आणि त्याहूनही मोठं म्हणजे तू एक चांगलं माणूस आहेस. तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहील… वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा अशोक तुझ्या आयुष्यात सहभागी होणं हीच माझी खरी श्रीमंती आहे…! अशी पोस्ट लिहून निवेदता यांनी अशोक सराफांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. Nivedita Saraf |
View this post on Instagram
दरम्यान, विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली वर्षानुवर्षे अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. अनेक सिनेमांमध्येही ते एकत्र काम करताना दिसले आहे. आजही दोघेही मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसतात. Nivedita Saraf |
हेही वाचा:
अफगाणिस्तान, म्यानमार, इराणसह ‘या’ १२ देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेशबंदी ; जाणून घ्या नेमकं कारण





