उर्वशी रौतेला झाली ‘उफ्स मोमेंट’ची शिकार

Urvashi Rautela Video । उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेचा भाग असते, मग ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक जीवन… सध्या उर्वशी तिच्या रब्बा करे या गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान उर्वशी एका ओप्स मोमेंटची शिकार झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक उर्वशीला तिचा स्टायलिस्ट बदलण्याचा सल्ला देत आहेत.
View this post on Instagram
रब्बा करे या गाण्याच्या प्रमोशनसाठी उर्वशी इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर गेली होती. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये तिचा ड्रेसची फॅशन अशी होती की यामुळे तीला ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. उर्वशी संगीतकार शेल ओसवालसोबत शोमध्ये पोहोचली होती. तिने काळ्या रंगाचा शीअर पॅन्टसूट घातला होता. जे लगेचच लक्ष केंद्रीत झाले. पापाराझींसाठी पोज देऊन उर्वशी माघारी फिरताच तिचा ड्रेस फाटला. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तेव्हापासून या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
उर्वशीचा व्हिडिओ पाहून लोक खूप कमेंट करत आहे. एकाने लिहिलं,’छी, एवढे मोठे लोक फाटलेले कपडे घालतात. असं म्हणत तिला ट्रोल केले जात आहे. फ्रेंच भाषिक व्हिडिओ व्हायरल झाला होता. नुकताच उर्वशीने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ती फ्रेंच बोलताना दिसत आहे. पण लोकांना ते आवडले नाही.





