अभिनेत्री उर्वशी रौतेलाला शूटींगदरम्यान दुखापत; रुग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. उर्वशी रौतेला हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान उर्वशीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. उर्वशीला हैदराबादमध्ये शूटींगदरम्यान ही दुखापत झाल्याचे समजत आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला साऊथचे दिग्गज सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांच्या ‘एनबीके 109’ या तेलुगु चित्रपटात झळकणार आहे. ‘एनबीके 109’ चित्रपटाच्या शूटींगवेळी उर्वशीला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.उर्वशीच्या टीमने जारी केलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये तिला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिथे त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते बालकृष्ण यांच्या ‘एनबीके 109′ या तेलगु चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल हा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं तिसऱ्या शेड्युलमधील चित्रीकरण हैदराबादमध्ये सुरु असल्याची माहिती आहे.’एनबीके 109’ हा चित्रपट नोव्हेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.





