उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली Oops मोमेंटची शिकार

Urvashi Rautela | बॉलीवूडसह हॉलीवूडचे अनेक कलाकार सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये आपला जलवा दाखवत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अलीकडेच रंगीबेरंगी गाऊनमध्ये येथे हजेरी लावली होती. यावेळी तिच्या पोपटाच्या आकाराच्या पर्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर उर्वशी पुन्हा रेड कार्पेटवर दिसून आली. मात्र यावेळी ती Oops मोमेंटची शिकार झाली. ब्लॅक गाऊन परिधान केलेला तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उर्वशीने डिझायनर नाजा सादे यांच्या कलेक्शनमधील ब्लॅक गाऊन परिधान केला होता. रेड कार्पेटवर एंट्री घेताच तिनं कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यास सुरुवात केली, तेव्हा हा गाऊन डाव्या हाताच्या काखेत फाटलेला असल्याचं दिसलं. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Urvashi Rautela :- First Indian to have a torn dress at Cannes? pic.twitter.com/ZqePMasB4K
— raman (@Dhuandhaar) May 18, 2025
यावरुन एक नेटकरी म्हणाला, “कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालणारी पहिली भारतीय अभिनेत्री”, दुसऱ्या युजरनं “जागतिक पातळीवर अशा प्रकारचा ड्रेस घालणं अजिबात योग्य नाही”, सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल केले जात आहे. तर काहींनी हे पब्लिसिटी स्टंट असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. Urvashi Rautela |
उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलिकडेच ती ‘डाकू महाराज’ चित्रपटातील तिच्या ‘दाबीडी दबीडी’ गाण्यातील डान्स स्टेप्स खूप चर्चेत होते. यानंतर ती लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘कसूर 2’ मध्ये दिसणार आहे. Urvashi Rautela |
हेही वाचा:





