Urmila Kanetkar: उर्मिला कानेटकरचा स्टायलिश अंदाज
Urmila Kanetkar: उर्मिलाच्या लूकचे अनेकांकडून कौतुक

Urmila Kanetkar: अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. आदिनाथ कोठारेसोबतच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर तिची सर्वत्र चर्चा सुरू होती. याबाबत तिने सोशल मिडियावर माहिती देत सांगितले होते. त्यानंतर तिने सोशल मीडियावरील नावातही बदल केला. तिने कोठारे हे नाव काढून पुन्हा कानेटकर लिहिले.
दरम्यान, ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि तिचे नवनवीन फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच उर्मिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.
View this post on Instagram
उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पांढरा रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. तसेच त्यावर पांढऱ्या रंगाचा जॅकेट घातला आहे. उर्मिलाच्या क्रॉप टॉपवर, ‘Not ONLY AM I PERFECY, I’M Mad Too’ असे लिहिले आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच उर्मिलाचा हा लूक पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.





