Urfi Javed on Chitra Wagh – उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यात सुरु झालेला वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी, उर्फी जावेद हिच्या ड्रेसिंगबाबत टिपणी करताना जोरदार आक्षेप नोंदवला होता. उर्फी विरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली होती. चित्रा वाघ युआनच्या आक्षेपानंतर उर्फी विरोधात मुंबईमध्ये FIR देखील दाखल करण्यात आली होती. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात भूमिका घेतल्यानंतर उर्फी देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. हा वाद सुरु झाल्यापासून उर्फीने आपल्या सोशल मीडिया खात्यावर चित्रा वाघ यांच्याविरोधात सातत्याने पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता उर्फीने या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेत चित्रा वाघ यांच्या दुखत्या नसेवर बोट ठेवलंय.
उर्फीने तिच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये तिने, मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चित्राजी व मी खूप चांगल्या मैत्रिणी होणार आहोत. संजय आठवतायेत का चित्राजी? अशी फिरकी घेतली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही त्यांच्या (संजय) सर्व चुका माफ केल्या. असेही उर्फीने म्हंटले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
महाविकास आघाडी सत्तेत असताना तात्कालाईन सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीने आत्महत्या केल्यानंतर आरोप झाले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. हे प्रकरण इतकं तापलं की मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर शिवसेनेतून फुटून शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या नव्या सरकारमध्ये भाजपने ज्या संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं.
राठोड यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतलेल्या चित्रा वाघ यांची मात्र राठोडांना मंत्रिपद देण्यात आल्यानं चांगलीच अडचण झाली. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता चित्रा वाघ यांनी आपला लढा सुरूच असल्याचे म्हंटले होते. अशातच आता उर्फी जावेदने देखील चित्रा वाघ यांना टार्गेट करताना संजय राठोड यांचं नाव वापरल्याने चित्रा वाघ यावर काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ( Urfi Javed on Chitra Wagh )
Can’t wait to be best friends with @ChitraKWagh after I join bjp . Remember Sanjay Chitra ji ? Aapke bjp join karne k baad Aapki toh badi dosti ho gyi thi k aap unki Saari galtiya bhool gyi thi jiske liye ncp me itna halla kiya tha!
— Uorfi (@uorfi_) January 3, 2023