यशश्री दाऊदच्या दबावाला का बळी पडली? ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

नवी मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकारणात रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आरोपी दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या का केली? याचा धक्कादायक खुलासा त्याने पोलिसांसमोर केला आहे. प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सूडाने पेटलेल्या आरोपीनं यशश्रीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. याच दरम्यान त्याने यशश्रीला एकदा शेवटचं भेटण्यासाठी वेळ मागितली होती अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडून देण्यात आली.,
पोलीस उपायुक्त अमित काळे काय म्हणाले ?
यशश्री शिंदे भेटायला येत नसल्याने आरोपी दाऊद शेख चिडला होता. तिने लग्नाला नकार दिल्याने त्याच्या रागात भर पडली. सोबत येण्यासाठी तो तगादा लावत होता. त्याचा तगदा आणि सतत होण्याऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीनं आला होता. तिथे त्यांच्यात वाद सुरू झाले आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
घटनास्थळावरून झाला पसार
पोलिसांनी आरोपी दाऊद शेखने गुन्हा करताना वापरलेले हत्यार हस्तगत केले आहे. आरोपीने यशश्रीचा खून केला यानंतर तो उरण रेल्वे स्टेशन वरून बेलापूर मार्गे पनवेल वरून रिक्षा पकडून कळंबोली हायवेवरून कर्नाटक गेला. यासाठी त्याने पनवेल स्टेशनवरुन मित्राने पाठवलेले हजार रुपये एटीएम मधून काढले. मयत मुलीच्या चेहऱ्यावर त्याने वापरलेल्या चाकूने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
यशश्री दाऊदच्या दबावाला का बळी पडली?
यशश्रीने आरोपीला भेटायला येण्यास नकार दिल्याने सोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दाऊद देत होता. घटनेत वापरलेलं हत्यार त्याने कर्नाटक येथूनच आणलं होतं. 23 जुलैला दाऊद कर्नाटकवरून उरणला आला. तेव्हापासून तो तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. मात्र,यशश्री त्याला नकार देत होती. शेवटी तिने होकार दिला आणि इथेच तिचा घात झाला. 24 तारखेला दोघेही जुईंनगर रेल्वे स्टेशनवर भेटले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उरणला भेटले. त्या दिवशीच आरोपीने तिला मारले. या दोघांमध्ये प्रेम प्रकरण असेल याबाबत सांगता येत नाही. मात्र त्याच्याकडे तिचे काही फोटो होते ज्यामुळे यशश्री घाबरून होती अशी शक्यता पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी वर्तवली आहे.





