UPSC Interview 2024 | UPSC मुलाखतीची तारीख ‘या’ कारणामुळे बदलली; नव्या तारखा जाहीर

UPSC 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुलाखतींच्या तारखांमध्ये बदल केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे मुलाखतीच्या तारखांमध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आहे.
नियोजित मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यानच दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मुलाखतीच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत सूचना upsc.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
युपीएससी अधिकृत नोटीस UPSC Interview 2024 |
युपीएससीने काढलेल्या अधिकृत नोटीस म्हटलं की, दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे. आणि याच दिवशी युपीएससीची मुलाखत पार पडणार होती. पण उमेदवारांची गैरसोय होऊ नये, तसंच दिल्लीतील रहिवासी असलेल्या उमेदवारांना मतदानासाठी वेळ मिळावा, यासाठी या दिवशी होणारी मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी होणारी मुलाखत आता ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडेल.’ त्यानुसार आधीच्या तारखानुसार दोन दिवस पुढे या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
ज्या उमेदवारांनी यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२४ उत्तीर्ण केली आहे. अशा उमेदवारांचा अंतिम मुलाखतीचा कार्यक्रम दिल्लीत ७ जानेवारी २०२५ ते १७ एप्रिल २०२५ या काळात पार पडणार आहे. यासाठी एकूण २८४५ उमेदवार मुलाखत देणार आहेत. मुलाखती दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळच्या सत्राची वेळ सकाळी ९ वाजता, तर दुपारच्या सत्राची वेळ १ वाजता आहे.
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 कधी झाली? UPSC Interview 2024 |
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 ही दोन शिफ्टमध्ये 20 सप्टेंबर ते 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते 12 आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. तर, प्राथमिक परीक्षा 16 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना 13 ते 19 डिसेंबरपर्यंत तपशीलवार अर्ज भरण्यासाठी म्हणजेच DAF भरण्यासाठी वेळ देण्यात आला होता.
अधिकृत वेबसाइटवर कसे तपासाल? UPSC Interview 2024 |
अधिकृत सूचना डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी. वेबसाइटच्या होम पेजवर ‘UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पर्सनॅलिटी टेस्ट 2024 डेट नोटिस’ या लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन PDF फाईल उघडेल, ज्यामध्ये उमेदवार आवश्यक तपशील पाहू शकतात.
हेही वाचा:





