nagar | उपसरपंच सोमनाथ कचरे यांचा भाजपामध्ये प्रवेश

नेवासा, (प्रतिनिधी) – आ.शंकरराव गडाख यांचे समर्थक व कुकाणा गावचे उपसरपंच सोमनाथ कचरे यांनी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर कचरे यांची भाजपाच्या तालुका उपाध्यक्ष निवड करण्यात आली. मुरकुटे व लंघे यांनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
कचरे म्हणाले की, २०१४ ते २०१९ या काळात तालुक्याचा झालेला विकास तसेच २०१९ ते २०२४ या काळात झालेला तालुक्याचा विकास यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे सांगून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे.
तळागाळातील जनतेची त्यांच्यासोबत नाळ जोडली गेलेली आहे. त्यांच्या विकास कामांकडे बघून मी आज स्वगृही परतल्याचे सांगितले. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे, नेवासा तालुका प्रसिद्धीप्रमुख रितेश भंडारी, आप्पासाहेब कावरे, पांडुरंग कावरे, सुरेश लिपणे, अरुण गरड, भागवत खराडे, विकास भागवत,
चंपुशेट बोरा,अण्णा पाटील गव्हाणे, बाळासाहेब क्षीरसागर,अरुण गरड ,मच्छिंद्र कचरे, अंबादास म्हस्के, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार, गणपत खराडे, डॉ.बाळासाहेब कोलते,राजू मिसाळ, तुकाराम कन्हेरकर,महेश कचरे, संदीप जावळे ,सुरेश लिपणे, विलासराव देशमुख, अनिल गर्जे, अनिकेत भारस्कर ,बाबासाहेब पडूळे,दत्तात्रय लंघे, शरद गरड आदी उपस्थित होते.





