UPI Rule Change : 1 ऑगस्टपासून UPI च्या ‘या’ नियमात होणार बदल; बँकांपासून यूझर्सपर्यंत सर्वांना होणार लागू
Updated On:

UPI Rule Change । देशात UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसचा (UPI Rule Change) वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हल्लीच्या काळात तळागाळातला व्यक्तीदेखील UPI चा वापर करताना दिसत आहे. मात्र आता UPI च्या नियमात बदल होणार आहे. 1 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार आहे. जर तुम्हीदेखील UPI चा वापर करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे.
‘या’ नियमात होणार बदल
- 1 ऑगस्टनंतर, तुम्ही UPI अॅपद्वारे दिवसातून पन्नासपेक्षा जास्त वेळा तुमचा बॅलन्स तपासू शकणार नाही.
- हा बदललेला नियम व्यापाऱ्यांपासून बँकांपर्यंत आणि यूझर्सना सर्वांना लागू होणार आहे.
- UPI वर ऑटो-पे व्यवहार (जसे की बिल पेमेंट, EMI आणि सबस्क्रिप्शन) आता फक्त निश्चित स्लॉटमध्येच होऊ शकतील.
- रिपोर्टनुसार, ही वेळ सकाळी 10 वाजण्यापूर्वी किंवा दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. याशिवाय, रात्री 9.30 नंतरही स्लॉट निश्चित केला जाईल.
- जर एखादा व्यवहार अयशस्वी झाला तर तुम्ही त्याची स्थिती तीन दिवसांनीच तपासू शकता. यासाठी, प्रत्येक वेळी किमान 90 सेकंदांचा गॅप असावा.
- हे नियम सर्व UPI यूझर्सना लागू होतील, मग ते Google Pay, Phone Pay किंवा Paytm चे यूझर्स असोत.
युजर्सवर काय होणार परिणाम?
- UPI नियमांमध्ये बदल केल्याने सामान्य यूझर्सवर कोणताही परिणाम होणार नाही.
- ते पूर्वीप्रमाणेच दररोज बिल पेमेंट आणि इतर पेमेंट किंवा ट्रान्सफर करत राहतील.
- पूर्वीप्रमाणेच, ते एका दिवसात एक लाख रुपयांचे व्यवहार करू शकतील.
- फरक एवढाच कि 1 ऑगस्टनंतर कोणताही UPI यूझर दिवसातून पन्नास वेळापेक्षा जास्त वेळा बॅलन्स तपासू शकणार नाही.





