31 मार्चच्या आधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, अन्यथा भरावा लागेल 50 टक्के अतिरिक्त कर

Updated ITR Deadline | तुम्ही जर अद्याप अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न (ITR-U) दाखल केले नसल्यास तुमच्याकडे शेवटची संधी आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातील ITR-U दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. या तारखेपर्यंत ITR-U दाखल दाखल न केल्यास 50% जास्त कर भरावा लागू शकतो.
आयकर विभागाकडून याबाबत करदात्यांना सूचना देण्यात आली आहे. विलंब न करता अपडेटेड ITR दाखल केल्यास अधिक दंड भरावा लागणार नाही.
अपडेटेड ITR (ITR-U) मध्ये करदात्यांना त्यांची चुकलेली माहिती सुधारण्याची संधी दिली जाते. सरकारने ही सुविधा 2022 मध्ये सुरू केली होती. या अंतर्गत करदाते मागील असेसमेंट वर्षाची योग्य माहिती नोंदवून कर भरू शकतात. ही सुविधा याआधी आयटीआर दाखल केलेल्या सर्व नागरिक, व्यवसाय व संस्थांसाठी उपलब्ध आहे.
31 मार्चपर्यंत ITR-U फाइल करण्याचे फायदे
जर करदात्याने 31 मार्च 2025 पर्यंत आपला अपडेटेड ITR फाइल केला, तर त्याला फक्त 25 टक्क्यांपर्यंत कर द्यावा लागेल. पण जर ITR-U 31 मार्च 2025 नंतर दाखल केल्यास अतिरिक्त कर 50 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे 50% अतिरिक्त करापासून वाचण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत ITR-U दाखल करणे आवश्यक आहे.
कधीपर्यंत दाखल करता येईल अपडेटेड ITR?
ITR-U दाखल करण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त 2 वर्षांचा कालावधी दिला आहे. पण या कालावधीत अतिरिक्त कर भरावा लागू शकतो. 31 मार्च 2025 पर्यंत ITR-U दाखल केल्यास 25% अतिरिक्त कर, तर त्यानंतर दाखल केल्यास अतिरिक्त कर 50% पर्यंत वाढेल.
जे करदाते काही कारणांमुळे त्यांच्या उत्पन्नाची माहिती अचूकरित्या देऊ शकले नाहीत, अथवा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये काही चूक असल्यास अपडेटेड आयटीआर 31 मार्च 2025 पर्यंत दाखल करू शकतील.





