जबरदस्त डिस्काउंट! 32MP सेल्फी कॅमेरा, 100W चार्जिंग सपोर्टसह येणारा OnePlus चा फोन मिळतोय स्वस्तात, पाहा डिटेल्स

OnePlus 12 Smartphone Offers: वनप्लसचा दमदार फीचर्ससह येणारा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. कंपनी OnePlus 12 स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून या फोनला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. वनप्लस 12 स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
OnePlus 12 स्मार्टफोनवरील ऑफर
OnePlus 12 स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. ऑफर अंतर्गत या फोनवर 7 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. ही डिस्काउंट ऑफर ICICI आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्डवर आहे. तसेच, जिओ प्लस पोस्टपेड प्लॅन असल्यास 2250 रुपयांचा फायदा मिळेल. या फोनला तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयसह देखील खरेदी करू शकता.
OnePlus 12 स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 12 मध्ये 6.82 इंच LTPO Pro XDR डिस्प्ले देण्यात आला असून, यात 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 16 जीबीपर्यंत LPDDR5x रॅम आणि 512 जीबीपर्यंत UFS 4.0 स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरसह येतो.
यामध्ये फोटोग्राफीसाठी रियरला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल मुख्य लेन्ससह 48 मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर मिळेल.
सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये 100 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5400mAh ची बॅटरी मिळेल.





