पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक
Updated On:

लखनौ – पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून उत्तरप्रदेशात ऑर्डनन्स फॅक्टरीतील एका कामगाराला अटक करण्यात आली. ती कारवाई उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केली.
आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तकाला संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुरवली जात असल्याचा सुगावा लागला. त्यावरून उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कामगार रविंद्र कुमार एटीएसच्या रडारवर आला. प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईल फोनमध्ये संवेदनशील कागदपत्रांची छायाचित्रे आढळली.
ती माहिती तो सोशल मीडियावरून नेहा शर्मा नावाने असणाऱ्या अकाऊंटवर पाठवत होता. मात्र, ते अकाऊंट बनावट आहे. पाकिस्तानी हस्तक असणाऱ्या महिला किंवा पुरूषाने ते बनवले होते. पैशांच्या आमीषातून रविंद्र संवेदनशील माहिती पुरवत असल्याचे समोर आले.





