UP Assembly Election Results 2022 : योंगींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत ‘सपा’त गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांचा दारून पराभव

उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. यूपीमध्ये आतापर्यंत 403 विधानसभा जागांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. अशा परिस्थितीत नुकतेच भाजप सोडून समाजवादी पक्षात दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी भाजप सोडून सपामध्ये दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भाजपचे सुरेंद्र कुशवाह यांनी येथे विजय मिळवला आहे. कुशवाह यांनी येथे 26 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत ट्विट करून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना स्वामी प्रसाद म्हणाले की, मी निवडणूक हरलो, हिम्मत नाही, संघर्षाची मोहीम सुरूच राहणार आहे. दरम्यान, फाजीलनगरमधून स्वामी प्रसाद मौर्य यांना 29647 मते मिळाली, तर भाजपचे सुरेंद्रकुमार कुशवाह यांना 55913 मते मिळाली आणि ते मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. दरम्यान, निवडणुकांपूर्वी सपात सामील झालेल्या मौर्य यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वळते याचा योग्य अंदाज आहे अशी चर्चा होती. मात्र आता त्यांच्या दारूण पराभव झाला आहे.
तसेच निवडणुकीत पराभवानंतर स्वामी प्रसाद यांच्या निवडणुकीपूर्वीच्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. भाजप सोडताच स्वामी प्रसाद यांनी स्वत:ला मुंगूस घोषित केले होते. तसेच नाग रूपी आरएसएस आणि साप रूपी भाजपला स्वामी रूपी मुंगुस उत्तरप्रेदाशातून संपवून टाकेल असे म्हंटले आहेत.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी 11 जानेवारी रोजी यूपीच्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनी भाजप देखील सोडला होता. दुसरीकडे, कुशीनगर जागांवर मतांच्या टक्केवारीचा विचार करता, फाजिलनगरमध्ये 56.08 टक्के, हाटामध्ये 57.90 टक्के, खड्डामध्ये 60.29 टक्के, कुशीनगरमध्ये 58.91 टक्के, पडरौनामध्ये 59.81 टक्के, रामकोलामध्ये 57.44 टक्के, ताकूमध्ये 56.48 टक्के मतदान झाले आहे.





