#UP Election 2022: यूपीच्या निवडणुकीत पिवळ्या साडीवालीचा कहर

लखनऊ : यूपी विधानसभेच्या निवडणुकीत ‘पिली साडीवाली’ पोलिंग ऑफिसर रीना द्विवेदी यांच्या ग्लॅमरस लुकची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रिना यांचा पिवळ्या साडीतील फोटो खूप वायरल झाला होता. आता रिना यांचा नवीन लुक राज्यात धुमाकूळ घालत आहे.
लखनौच्या सार्वजनिक बांधकाम विभागात क्लर्क म्हणून कार्यरत रिना द्विवेदी सध्या मोहनलालगंज येथे निवडणुकीची तयारी करीत आहेत. आज मंगळवारी ड्युटीवर निघाल्या तेव्हा त्यांचा नवीन ग्लॅमरस लुक बघायला मिळाला. काळा स्लीवलेस टॉप आणि पांढया ट्राउजर्समध्ये रिना यांना बघताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
तसे बघितले तर यूपीच्या निवडणुकीत अनेक महिला अधिकारी निवडणुकीच्या कामात लागल्या आहेत. परंतु, रिना द्विवेदी यांची चर्चा होण्याचे कारण वेगळे आहे. 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पिवळी साडी आणि स्लीवलेस ब्लॉउजमधला फोटो खूप व्हायरल झाला होता. यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत त्या काय घालतात याची उत्सुकता मीडियाला लागून होती.
आज रिना द्विवेदी काळा स्लीवलेस टॉप आणि पांढऱ्या ट्राउजर्स घालून बूथकडे निघाल्या तर सर्वांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या. त्यांच्या अवतीभोवती लोकांची गर्दी जमा झाली. सामान्य माणसं आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत पोलिसांनीसुद्धा त्यांच्यासोबत खूप सेल्फी काढल्यात. यावेळेस जास्तीत जास्त मतदान व्हावे असा आमचा प्रयत्न असल्याचे रिना यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
रिना म्हणाल्या की, मतदारांना मतदानासाठी जागरूक करण्यासोबतच जे काम आपल्यावर सोपविले जाईल ते प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न आहे. ग्लॅमरस लुकबाबत विचारले तर त्या म्हणाल्या की, ‘मी फॅशनेबल आणि नवीन ट्रेंडला नेहमीच फॉलो करीत असते. काळानुसार चालणे मला आवडते. म्हणूनच मी नवीन गेटअप केला आहे’ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रिना द्विवेदी यांची ड्युटी नगराम येथे होती. 2017 मध्ये सरोजनीनगर मतदारसंघात तैनात होत्या.





