#UP Election 2022: रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ – अखिलेश यादव
Updated On:

प्रयागराज (उत्तर प्रदेश) – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारने युवकांचा रोजगार हिसकावून घेतला आहे. नोटाबंदी आणि लॉकडाऊनसारखे निर्णय घेऊन देशातील बेरोजगारी वाढविली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सप सत्तेवर आल्यास सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिली.
प्रयागराज येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. अखिलेश यादव म्हणले, उत्तर प्रदेशमध्ये चार टप्प्यात मतदान झाल्यापासून भाजप “थंड आणि नम्र’ झाली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने सरकारी कंपन्या खासगी क्षेत्राला विकण्याचे धोरण अवलंबिले आहे; परंतु जेव्हा समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन होईल, तेव्हा आम्ही सर्वांना रोजगार देऊ. तसेच पोलीस खात्यातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.





