Baramati News : बारामतीत दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
Baramati News : हा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Baramati News : काल २२ जुलै रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वच क्षेत्रातील अनेकांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. २८ जानेवारी या दिवशी अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं.
आज २३ जुलै रोजी बारामती येथे राज्याचे दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या जनसेवेचा, विकासाभिमुख नेतृत्वाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. हा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





