अवकाळीचा फटका! नेवासा तालुक्यात केळी, गहू, कांदा, पिकांचे मोठे नुकसान! वीज अंगावर पडून म्हैस दगावली

नेवासा: नेवासा तालुक्यातील देडगांव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी, हिवरे येथील शेतकऱ्यांच्या गहू, केळी, कांदा पिकांचे मोठे नुकसान गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पाऊसामुळे झाले. वाहूरवाघ नावाच्या शेतकऱ्याची एक म्हैस वीज पडून जागीच मृत्यू पडल्याची घटना घडली आहे.
शुक्रवारी सकाळी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सुधीर पाटील, नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिराजदार, तालुका कृषी अधिकारी हिरवे नेवासा, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, कृषी सहाय्यक रुपेश पवार, सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माळी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी रामदास कांदे यांचे सोसाट्याच्या वाऱ्याने बोरीचे एक मोठे झाड उन्मळून जनावरांच्या शेडवरती पडले होते. याची पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रचंड नुकसान झालेली असून जनावरांची संरक्षण भिंत तसेच पत्रे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.





