पिंपरी | खालापूर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं संकट उभे टाकल्याने शेतकऱ्यांसह अनेकजण चिंतेत सापडले आहेत. त्यातच सोमवारी (दि. 13) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास अचानक पाऊ असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली.
अनेकांनी अवकाळी पावसापासून बचाव मिळावा आडोसा शोधला. तर व्यापारी आपल्या साहित्याचा बचाव करण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले. या पावसाने वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर उकाड्यापासून हैराण झालेल्या खालापूरकरांना दिलासा मिळाला.
खालापुर तालुक्यातील ग्रामीण केलवली-नावंढे परिसरासह अन्य ग्रामीण भागला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. जोरदार वार्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल त्या छपराचा आसरा घेतला.
पावसामुळे मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच फजिती झाली. दुचाकीस्वारही पावसापासून बचाव करण्यासाठी जवळच्या दुकानाचा आसरा घेताना दिसून आले.





