राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका ; ‘या’ जिल्ह्यांना यलो अर्लट जारी

Unseasonal rain । राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा फटका बसणार आहे. हवामानशास्त्र विभागाने आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाजही वर्तवलाय.
मागच्या २४ तासांमध्ये जळगावमध्ये उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता Unseasonal rain ।
जळगाव, नाशिकमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 16, 2024
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट Unseasonal rain ।
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा
आज मुंबईत “मोदीराज” ! पहिल्यांदाच नरेंद्र मोदी, राज ठाकरे एकाच व्यासपीठावर





