पाळीव कुत्रीवर ज्येष्ठ नागरिकाकडून अनैसर्गिक अत्याचार

राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरानजीक एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पाळीव कुत्रीवर (pet dog) अनैसर्गिक अत्याचार केल्याचा घाणेरडा प्रकार उघड झाला असून हे कृत्य करताना त्याचे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.
राजगुरूनगर शहरालगत असलेल्या गावात येथे ही विकृत व्यक्ती राहते. त्याने राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे आमिष दाखवून घरामध्ये घेवुन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. हा सगळा प्रकार स्थानिक युवकांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले आहे.
याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम 377 (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे. (Unnatural abuse of pet dog by senior citizens)





