Post Office Scheme : आजच्या महागाईच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या काळात बचत करणे खूप कठीण झाले आहे. सतत खरेदी, महागड्या हॉटेल्समध्ये जेवण, पार्टी, ब्रँडेड वस्तूंची खरेदी याकडे लोक आकर्षित होत आहेत. यामुळे भविष्यासाठी किंवा निवृत्तीनंतर पुरेशी बचत होत नाही आणि ऐनवेळी कुटुंबीयांना आर्थिक अडचणी येतात. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसने (Post Office Scheme) ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली Senior Citizen Savings Scheme (SCSS) ही योजना खूप फायदेशीर ठरत आहे. ही योजना रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न, सुरक्षित बचत आणि आर्थिक चिंतेपासून मुक्ती देण्यासाठी उत्तम पर्याय मानली जाते. हे पण वाचा : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड; ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य SCSS योजना म्हणजे काय? SCSS ही भारत सरकारच्या पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी योजना आहे. सरकारी हमी असल्याने ही गुंतवणूक पूर्णपणे रिस्क-फ्री मानली जाते. रिटायर झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळावे, त्यांची बचत सुरक्षित राहावी आणि पैशाची काळजी नसावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या ही योजना देशभरात खूप लोकप्रिय होत आहे. व्याजदर आणि उत्पन्नाची रचना SCSS मध्ये सध्याचा व्याजदर 8.2% प्रति वर्ष आहे. हा दर अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) पेक्षा जास्त आहे. व्याजाची रक्कम तिमाही (प्रत्येक तीन महिन्यांनी) थेट खात्यात जमा होते, ज्यामुळे दरमहा नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होते. Post Office Scheme उदाहरणार्थ, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने कमाल मर्यादेनुसार ३० लाख रुपये गुंतवले, तर ८.२% व्याजदराने वर्षाला अंदाजे २ लाख ४६ हजार रुपये व्याज मिळू शकते. हे व्याज तिमाही स्वरूपात मिळाल्यास, दरमहा सुमारे २०,५०० रुपये इतके नियमित उत्पन्न मिळू शकते. घरबसल्या हा पैसा मिळाल्याने रिटायरमेंटनंतरचा काळ आर्थिक तणावाशिवाय आनंदाने जगता येतो. हे पण वाचा : Private Jet Crash : मोठी दुर्घटना..! खासगी विमान कोसळलं; ८ प्रवाशी करत होते प्रवास गुंतवणुकीची मर्यादा आणि करसवलत – किमान गुंतवणूक : फक्त १,००० रुपये – कमाल गुंतवणूक : एका व्यक्तीच्या नावे ३० लाख रुपये (जॉइंट अकाउंटमध्ये पती-पत्नी एकत्र ३० लाख पर्यंत गुंतवू शकतात, परंतु प्रत्येकाच्या स्वतंत्र खात्यात ३० लाख पर्यंतची मर्यादा लागू होते.) – करसवलत : गुंतवलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत वर्षाला १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते. व्याजावर मात्र कर लागतो. योजनेचा कालावधी आणि नियम – मुदत : ५ वर्षे (पुढे आणखी ३ वर्षांसाठी वाढवता येते, म्हणजे एकूण ८ वर्षे) – मुदतीपूर्वी बंद करणे : जर १ वर्षानंतर बंद केले तर दंड लागतो. – वयाची पात्रता : खाते उघडण्यासाठी किमान ६० वर्षे पूर्ण असणे आवश्यक. मात्र, VRS (स्वेच्छानिवृत्ती योजना) घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ५५ वर्षांपासून आणि संरक्षण दल/पॅरामिलिटरी फोर्समधून निवृत्त झालेल्यांना ५० वर्षांपासून पात्रता मिळते. का निवडावी SCSS? – सरकारी हमीमुळे पूर्ण सुरक्षित – बँक FD पेक्षा जास्त व्याज – तिमाही व्याजामुळे नियमित मासिक उत्पन्नासारखा फायदा – करसवलत + सुरक्षित गुंतवणूक – रिटायरमेंटनंतर आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उत्तम पर्याय महागाईच्या या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी SCSS ही योजना खूप उपयुक्त ठरत आहे. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अधिक माहिती घ्या आणि आपल्या भविष्यासाठी ही योजना निवडा. हे पण वाचा : अभिषेकच्या बॅटमध्ये नक्की काय लपलंय? न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भरमैदानात घेतली झडती; पाहा VIDEO