अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पुणे -अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक कृत्य करायला लावणाऱ्या विकृत व्यक्तीस स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रवींद्र ऊर्फ बल्ली कांबळे (32, रा. डायस प्लॉट) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार सेव्हन लव्हज चौक पूल ते पूनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळ मंगळवारी घडला.
याप्रकरणी 15 वर्षांच्या मुलाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कांबळे याने या दोन मुलांना आमिष दाखवून मोटार सायकलवर बसवून पूनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळ नेले. तेथे त्यांच्यातील एकाला त्याने दारू आणण्यासाठी पाठवले.
त्यानंतर त्याने या मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला सांगितले. या मुलाने त्याला विरोध केल्यावर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडणे, “पोक्सो’ अशा कलमांखाली गुन्हा दाखल करुन कांबळे याला अटक केली.




