Himachal : ‘दिल्ली-धर्मशाला-दिल्ली’ इंडिगो विमान सेवेला प्रारंभ

नवी दिल्ली – इंडिगो एअरलाइनच्या पहिल्या दिल्ली-धर्मशाला-दिल्ली विमान सेवेला रविवारपासून(दि.26) प्रारंभ झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांनी या विमानाला हिरवा झेंडा दाखवला.
डोंगराळ प्रदेशात हवाई वाहतूक केल्याशिवाय इंडिगो खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विमान कंपनी बनू शकली नसती, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. सध्या संपूर्ण भारतातून हिमाचलमध्ये येणाऱ्या प्रवाशांना दिल्लीला जावे लागते आणि त्यानंतर या राज्यात येणाऱ्या विमानाने प्रवास करावा लागतो. मोठ्या विमानतळामुळे प्रवाशांना थेट अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. अल्पावधीतच ही संख्या 74 वरून 140 च्या वर गेली आहे. उडान योजनेमुळे हवाई चप्पल वापरणारे नागरीकसुद्धा विमान प्रवास करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में विमान सेवा के लोकतंत्रीकरण का उदहारण है दिल्ली-धर्मशाला विमान सेवा, जिस से आस पास के ज़िलों को हवाई संपर्क व इस पहाड़ी क्षेत्र के विकास को बल मिलेगा। #UDAN_RCS की यह सेवा पर्यटन, रोजगार एवम क्षेत्रीय समृद्धि में नया आयाम जोड़ेगी। pic.twitter.com/lCF1Flm0WJ
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 26, 2023
धरमशाला विमानतळावरून 1990 मध्ये पहिली विमान सेवा सुरू झाली आणि त्यानंतर त्याची सेवा विस्तारली आणि आता त्याला 1376 मीटरची धावपट्टी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह म्हणाले.
दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे – राज्यपाल बैस
नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या 65 वर्षात जे काही साध्य झाले नाही ते गेल्या 9 वर्षात 148 विमानतळ, वॉटरड्रोम आणि हेलीपोर्टसच्या निर्मितीने साध्य झाले आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी सांगितले. येत्या तीन ते चार वर्षांत ही संख्या 200 च्या पुढे नेण्याच्या उद्दिष्टाने मंत्रालय कार्यरत आहे. हा प्रयत्न मोठ्या मेट्रो विमानतळांना तसेच शेवटच्या घटकापर्यंत संपर्क यंत्रणा प्रदान करणाऱ्या दुर्गम विमानतळांना समान महत्त्व देईल, असेही त्यांनी सांगितले.





