केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून जेष्ठ नेते दिनकरराव ताके यांच्या प्रकृतीची विचारपूस

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा येथील दौऱ्याच्या निमित्ताने केंद्रीय क्रिडा व युवा कल्याणमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शनिवार (दि.३१) रोजी नेवासा येथील भाजप राष्ट्रीय परिषदेचे सदस्य जेष्ठ नेते दिनकरराव ताके पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
जेष्ठ नेते दिनकरराव ताके पाटील यांच्या नेवासा येथील निवासस्थानी दिलेल्या भेटी प्रसंगी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील,भाजपचे युवा नेते मनोजअण्णा पारखे,प्रतीक शेजूळ,भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा भारतीताई बेद्रे,शहराध्यक्ष रोहित पवार उपस्थित होते.
यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते दिनकरराव ताके पाटील यांचे सुपुत्र अशोकराव ताके यांच्या हस्ते केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दिलेल्या भेटी प्रसंगी दिनकरराव ताके पाटील यांनी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे,स्व.प्रमोदजी महाजन,जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या बरोबर पक्षासाठी केलेले कार्य विषद करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला.





