नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांना धमकीचा संदेश आला आहे. त्यांच्याकडे मेसेजद्वारे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी संजय सेठ यांच्या मोबाइलवर ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा धमकीचा संदेश आला होता. त्यानंतर त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीच्या डीसीपींना या प्रकरणाची माहिती दिली.
धमकीच्या संदेशाबाबत त्यांनी डीसीपींची भेट घेतली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. धमकीचा हा मेसेज झारखंडच्या रांची येथून आला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर मंत्र्यांनी स्वत: झारखंडचे पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांच्याशी बोलून तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.