Union Budget 2025 : लाल रंग आणि बजेटचं कनेक्शन काय? अर्थसंकल्प लाल रंगाच्या बॅगमधूनच का सादर करतात, पाहा….

Union Budget 2025 | Nirmala Sitharaman – प्रत्येक देशातील सरकार दरवर्षी आपला अर्थसंकल्प सादर करत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या म्हणजेच, 1 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करतील. अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा विक्रमी आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळीही अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत.
हे बजेट जेवढे महत्त्वाचे असते, तवढेच त्याचे सादरीकरणही विशेष मानले जाते. लाल कपड्यात बजेट आणण्याची परंपरा फक्त भारतातच आहे असे नाही. जगातील इतर अनेक देशांमध्ये बजेट लाल कपड्यात किंवा ब्रीफकेसमध्ये सादर केले जाते. लाल रंगातील पाउचमध्ये बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? बजेट ‘लाल रंगाच्या कपड्यात’च का आणले जाते. लाल रंगला एवढे महत्व का आहे? यावरच आज आपण बोलणार आहोत…
पूर्वी चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवण्याची परंपरा होती. भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पापासून बजेटची कागदपत्रे चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये ठेवण्याची परंपरा आहे. 1947 च्या पहिल्या बजेटसाठी लाल रंगाच्या चामड्याचे ब्रीफकेस वापरण्यात आले होते. या ब्रीफकेसला ‘ग्लॅडस्टोन बॉक्स’ म्हणतात.
नंतर काही मंत्र्यांनी काळ्या ब्रीफकेसमध्ये तर काहींनी इतर डिझाइनच्या बॅगमध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवली. मात्र, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली होती. आणि नंतर देखील बंद झाले. आणि आता मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे अर्थसंकल्प सादर केला जातो.
लाल रंग का महत्वाचा आहे?
बजेट सादर करताना लाल रंगाच्या पाउच किंवा ब्रीफकेसचा वापर केला जातो, कारण लाल रंग सामर्थ्य, स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक आहे. हा रंग सूर्य, अग्नी आणि जीवनाशी निगडित आहे. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये हा रंग संपत्ती, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो.
त्यामुळे सरकार बजेट सादर करताना जनता आणि देशाच्या आर्थिक स्थितीला बळकट करण्याचा संदेश देते. असे म्हणता येईल. विशेषतः लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. लाल रंग हा ऊर्जा, उत्साह, सौभाग्य, साहस आणि नवजीवनाचा प्रतीक मानला जातो.
हा रंग नवसुरुवातीच्या संकल्पनांना दर्शवतो. लाल रंग लक्षवेधक असल्याने महत्त्वाच्या घोषणांसाठी हा रंग उत्तम पर्याय मानला जातो. याशिवाय लाल रंग हा भारतीय परंपरेचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच या रंगाचा वापर बजेट सादर करताना केला जातो.
अशा प्रकारे बदलत गेला अर्थसंकल्प सादर करण्याच्या फॉर्मेट :
2014: ब्लैक ब्रीफकेस
2015: ऑरेंज ब्रीफकेस
2016: रेड ब्रीफकेस
2017: ब्राउन ब्रीफकेस
2018: मरून ब्रीफकेस
2019: रेड ब्रीफकेस/ वहीखाता
2020: वहीखाता
2021: देशी टैब (मेड-इन-इंडिया टॅबलेट)
यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 16 विधेयके मांडली जाण्याची शक्यता :
– बँकिंग कायदे ( सुधारणा) विधेयक, 2024
– रेल्वे (सुधारणा) विधेयक, 2024
– आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024
– तेलक्षेत्र(नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, 2024
– बॉयलर विधेयक, 2024
– गोव्याच्या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक, 2024
– वक्फ (सुधारणा) विधेयक, 2024
– मुसलमान वक्फ (रद्दबातल) विधेयक, 2024
– बिल्स ऑफ लेडिंग (जहाजावर मालभारण )विधेयक, 2024
– समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक, 2024
– किनारपट्टी नौवहन विधेयक, 2024
– मर्चंट शिपिंग विधेयक, 2024
– वित्त विधेयक, 2025
– हवाई वाहनांमधील हितसंबधांचे संरक्षण विधेयक, 2025
– त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक, 2025
– स्थलांतर आणि परदेशी व्यक्ती विधेयक, 2025





