Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या तिसऱ्या टर्मचा आज पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी देखील काही महत्वाच्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या असून, त्याचा महिलांना चांगला फायदा होणार आहे. यावेळी बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकार पहिल्यांदाच व्यवसाय करणाऱ्या पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमातीतील उद्योजकांसाठी २ कोटी रुपयांचे कर्ज सुरू करेल. मागासवर्गीय महिलांसाठी एक विशेष योजना आणली जाईल. सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० सुरू केले जाईल. अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, लघु आणि मध्यम उद्योग आणि मोठ्या उद्योगांसाठी एक उत्पादन अभियान स्थापन केले जाईल. याशिवाय, सरकार कामगार-केंद्रित क्षेत्रांची उत्पादकता वाढवण्यासाठी सुविधाजनक उपाययोजना करेल. त्यांनी सांगितले की कर्ज हमी कव्हर दुप्पट करून २० कोटी रुपये केले जाईल आणि हमी शुल्क एक टक्का कमी केले जाईल. महिला आणि मुलांचे पोषण बळकट करण्यासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० योजना देखील सुरू केल्या जातील. महिलांसाठी करण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणा : – दोन कोटी रुपयांचा मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक महिलांना देण्यात येणार आहे. – महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार – मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी ही योजना असून पाच लाख महिलांना योजनेचा लाभ होणार – महिलांना स्टार्टअप साठी दोन कोटी रुपयांची मदत – इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन करणार – सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना- आठ कोटीहून अधिक लहान मुलांना पोषणमूल्य मिळणार – स्टार्टअप्ससाठी ₹10,000कोटींची तरतूद – एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत – देशभरातील एक कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना, एक लाख किशोरवयीन मुलींना पोषणमूल्य वाढवणार (आकांक्षीत जिल्हे- aspirational district) ईशान्य भारतातही विशेष लक्ष