Deepika Padukone : दुसरी प्रेग्नन्सी जाहीर करताच दीपिका ॲक्शन मोडवर; ‘किंग’च्या सेटवर दमदार अंदाज
Deepika Padukone : 'किंग' व्यतिरिक्त दीपिका पादुकोण दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत 'राका' या चित्रपटातही झळकणार आहे.

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेता दीपिका पादुकोणने दुसरी प्रेग्नन्सी जाहीर केल्यानंतर ती कामातून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा आहेत. दीपिकाने शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटासाठी एका हाय-व्होल्टेज ॲक्शन सीनचे शूटिंग पूर्ण केले आहे.
दुसऱ्यांदा आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत दीपिकाने शेअर केल्यानंतर ती पुन्हा शूटिंग सेटवर परतल्याने सर्वच जण थक्क झाले आहेत. कारण पहिल्या लेकीच्या जन्मानंतर दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची अट ठेवली होती. यामुळे तिला काही चित्रपटांमधून बाहेर पडावं लागलं.
मीडिया रिपोर्टनुसार, २१ आणि २२ एप्रिल रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील ‘गोल्डन टोबॅको स्टुडिओ’मध्ये या विशेष सीनचे चित्रीकरण पार पडले. या हाय-ऑक्टेन कॉम्बॅट सीनमध्ये दीपिका पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये सेटवर आली.
शाहरुख खान आणि दीपिकाने या दोन दिवसांत हाय ऑक्टेन फाईट सीक्वेन्स शूट केला असून, यासाठी स्टुडिओमध्ये मोठा सेट उभारण्यात आला होता. Deepika Padukone
शाहरुख खानच्या ‘किंग’ व्यतिरिक्त दीपिका पादुकोण दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत ‘राका’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातही झळकणार आहे. मात्र प्रेग्नन्सीच्या काळातही कामाचा उत्साह कायम ठेवत दीपिकाने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे.
Deepika Padukone
हेही वाचा:
PMC News : पालिकेचा अजब कारभार! करोडोंचे भूसंपादन पण हिशोब मिळेना; सभेत अधिकारी निरुत्तर






