Pimple Gurav : पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत इमारत जमीनदोस्त; ४३२ चौ.मी. बांधकामावर कारवाई
Pimple Gurav : सहा मजली आर.सी.सी. अनधिकृत बांधकाम भुईसपाट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीरपणे उभे राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने पिंपळे गुरव प्रभाग क्र. २९ मधील प्रभात नगर येथे मंगळवारी सहा मजली आर.सी.सी. अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. या कारवाईत प्रशासनाने तब्बल ४३२.०० चौ.मी. क्षेत्र अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.
शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत चालले आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांनी स्वतःच्या अधिपत्याखाली नियोजन करून बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी (दि.६) सकाळी प्रभात नगर भागात पालिकेचे अतिक्रमण धडक पथक थेट साधनसामग्रीसह दाखल झाले.
शक्तिशाली १ जॉ क्रशर, २ जे.सी.बी. (पोकलेन) आणि १ ट्रॅक्टर अशा यंत्रसामग्रीचा वापर केला. महापालिकेचे बीट निरीक्षक विकास वारभुवन, सचिन फडतरे आणि रुपक शिनगारे यांनी काही तासांत हे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले. या कारवाई दरम्यान स्थानिक पातळीवर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने मोठा फौजफाटा तैनात केला होता. या मोहिमेत १५ महाराष्ट्र सुरक्षा बल, जवान आणि ३ पोलीस कर्मचारी पूर्ण तयारीनिशी घटनास्थळी तैनात होते.
Vadgaon Maval : भातपिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाच्या दडीने ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक





