‘परिस्थिती हाताबाहेर जातीय’ ; इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेच्या एन्ट्रीने संयुक्त राष्ट्र चिंतेत

UN chief Guterres on Israel Iran war। इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. भारतीय वेळेनुसार, रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यांसाठी इस्रायलने अमेरिकेचे कौतुक केले आहे. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेच्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली. याविषयी बोलताना संयुक्त राष्ट्रांनी ‘हा संघर्ष हाताबाहेर जाण्याचा धोका वेगाने वाढत आहे’.असे म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी, ‘आज अमेरिकेने इराणविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईबद्दल ऐकून मला खूप चिंता वाटते. आधीच तणावाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रदेशात ही एक धोकादायक प्रक्षोभक कृती आहे आणि ती आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका आहे.’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘संघर्ष नियंत्रणाबाहेर जात ‘ UN chief Guterres on Israel Iran war।
गुटेरस यांनी यावेळी, ‘हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वेगाने वाढत आहे – ज्याचा केवळ सामान्य नागरिकांवरच नाही तर संपूर्ण प्रदेश आणि संपूर्ण जगावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. मी सर्व सदस्य देशांना तणाव कमी करण्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या इतर नियमांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन करतो.’ असे म्हणत चिंता व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी यावेळी, ‘या अत्यंत संवेदनशील काळात अराजकता टाळणे खूप महत्वाचे आहे. या संकटावर कोणताही लष्करी उपाय नाही. पुढे जाण्याचा मार्ग फक्त राजनैतिक कूटनीति आहे आणि शांतता ही एकमेव आशा आहे.’असे सांगितले.
शांतता आणि धोका एकत्र करण्याचे आवाहन UN chief Guterres on Israel Iran war।
ट्रम्प यांनी रविवारी राष्ट्राला संबोधित करताना शांततेचे आवाहन केले आणि इराणला पुन्हा इशारा दिला की ‘अजूनही अनेक लक्ष्ये शिल्लक आहेत. जर इराण अजूनही शांततेकडे वाटचाल करत नसेल तर भविष्यात आणखी भयानक हल्ले होतील.’ ट्रम्प म्हणाले की ‘इराणमध्ये एकतर शांतता येईल किंवा विनाश होईल.’
हेही वाचा
इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; ‘सामना’तून राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घणाघात





