धीरेंद्र शास्त्रींच्या ‘मोक्ष’वरील विधानावर उमा भारती भडकल्या ; बागेश्वर धाम बाबाला दिला ‘हा’ सल्ला

Uma Bharti on Dhirendra Shahstri । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान मौनी अमावस्येच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. ज्यामध्ये चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. गंगा नदीत स्नान करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या लोकांचा येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. याबाबत बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले होते. गंगाकाठी मृत्युमुखी पडणाऱ्यांना मोक्ष मिळतो, म्हणून हा मोक्ष मानला पाहिजे, अपघात नाही. आता धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती चांगल्याच संतापल्या आहेत.
धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानाशी उमा भारती सहमत नसल्याचे त्यांनी म्हटले. याविषयी बोलताना त्यांनी, “कुंभात स्नान केल्याने मोक्ष मिळतो हे खरे आहे, पण तिथले लोक चिरडून आणि वेदनेने मरण पावले, हे मोक्ष नाही. जे जिवंत आहेत त्यांचे कुटुंब चेंगराचेंगरीत वेदनेने मरण पावले, त्यांनी कोणते पाप केले?”असा संतप्त सवाल देखील यावेळी उमा भारती यांनी केला.
‘संतांनी संवेदनशीलतेची जाणीव ठेवली पाहिजे’ Uma Bharti on Dhirendra Shahstri ।
एवढेच नाही तर उमा भारती यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनाही सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मला वाटते की संताने त्याच्या संवेदनशीलतेची काळजी घेतली पाहिजे आणि त्याबद्दल सतर्क देखील राहिले पाहिजे.”
‘मृतदेहांवर राजकारण होऊ नये’
उमा भारती पुढे म्हणाल्या की, “महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत आपण त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही ही आपल्यासाठी दुःखद गोष्ट आहे. तपास यंत्रणा निष्पक्षपणे तपास करत आहेत. लवकरच निकाल समोर येतील आणि चेंगराचेंगरी कशी झाली हे कळेल. उमा भारती म्हणाल्या की, मृतदेहांवर राजकारण होऊ नये.”असेही त्यांनी यावेळी म्हटले.
‘चेंगराचेंगरीमागील कट’ Uma Bharti on Dhirendra Shahstri ।
उमा भारती म्हणाल्या, “आयुक्तांचा एक व्हिडिओ समोर येत आहे ज्यामध्ये ते लोकांना आंघोळ करण्याचे आवाहन करत आहेत. यानंतर अचानक बॅरिकेड्स हटवले जातात आणि लोक पळू लागतात. तिथे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे हे देखील खरे आहे. चेंगराचेंगरी कशी आणि कोणी घडवली हे समोर आले पाहिजे. जे घडले ते दुःखद आणि लज्जास्पद आहे.”
हेही वाचा
दिल्लीत भाजपची सत्ता आली तर कोण होणार मुख्यमंत्री ? ; ‘हे’ ५ मोठे नेते शर्यतीत





