Ukraine-Russia war: रशियाने वाढवली हल्ल्याची व्यापकता, लवकरच किव्ह ताब्यात घेणार

किव्ह – डीन्प्रो शहरावर रशियाने जोरदार हवाई हल्ले केले. त्यात एक शाळा, चपलांचा कारखाना उद्ध्वस्त झाला. एकाचा मृत्यू झाला. लत्सक. इव्हानो फ्रॅन्कीव्ह आणि डीन्प्रो या शहरावर प्रथमच हल्ला करण्यात आला. दरम्यान, युक्रेन रासायनिक अस्त्रे बनवण्याच्या तयारीत असल्याचा रशियाचा दावा युक्र्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी फेटाळून लावला. यामुळे रशियाने हल्ले अधिक तीव्र केले असून त्याची व्यापकता वाढवली असल्याचे दिसत आहे.
हा आरोप चुकीचा असून रशिया या स्वरूपाच्या अस्त्राच्या वापराचे समर्थन करण्यासाठी हा आरोप करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. रशियाच्या पाठींब्यावरील युक्रेनमधील सैन्याच्या मदतीसाठी कार्यकर्ते जवान पाठवण्याच्या योजनेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पाठींबा दिला.
रीशयन फौजा किव्हच्या दिशेने सुमारे पाच किमी पुढे सरकल्या असल्याचे अमेरिकेतील वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. तुर्के येथे दोन्ही राष्ट्रात सुरू असणारी चर्चा कोणत्याही ठोस तोडग्याविना संपुष्टात आली. रशियन फौजा आणि पुतीन यांच्या विरोधातील “कॉल फॉर व्हायलन्स”साठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामने आपल्या नियमांत तात्पुरते बदले केले आहेत.
क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथे विमनाच्या आकाराचा ड्रोन आदळला. हा ड्रोन रशियन बनावटीचा असून तो युक्रेनच्या लष्करातील आहे की रशियाच्या याचा ऊलगडा होऊ शकला नाही, अशी माहिती क्रोएशियाचे पंतप्रधान अँड्रेज प्लेन्कोव्हिक यांनी दिली. रात्री अकराच्या सुमारास हा ड्रोन पडला. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.





