UK hit by lightning strikes | यूकेच्या दक्षिण इंग्लंड आणि ईस्ट मिडलँड्समध्ये निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे, गारांसह गडगडाटी वादळामुळे अनेक भागात पूर आला आहे. एकाच दिवसात जवळपास 400 पेक्षा अधिक वेळा वीज चमकल्याने नागरिक घाबरले आहेत. हवामान विभागाने माहिती दिली, 10 ते 15 मिलीमीटर पाऊस जवळपास 1 तास सुरू होता. यामुळे काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. वाढत्या हवामान बदलाच्या परिणामांमुळे अशा घटनांची शक्यता आणखी वाढू शकते. ब्रिटनच्या हवामान विभागाने सांगितले की, काही भागांमध्ये पूरही आला आहे. पूर व पावसामुळे यॉर्कशायरमधील काही भागांना बंद करण्यात आले होते. हवामानशास्त्रज्ञ एली ग्लेजियर यांनी सांगितले, “लंडन आणि बकिंघमशायरच्या काही भागांत गडगडाटासह वादळ आले होते. इतर भागात देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. हवामान विभागाने माहिती दिली, पावसासोबतच एकाच दिवसात 300 ते 400 वेळा वीज चमकण्याची घटना घडली. यूकेमध्ये 1972 नंतर पहिल्यांदाच सर्वात उष्ण दिवस अनुभवायला मिळाला. काही भागांमधील तापमान 21 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, पर्यावरण संस्थेने यूकेच्या 22 भागांमध्ये पूराची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये नॉर्थ हॅम्पशायर, सॅलिसबरी आणि हर्टफोर्डशायरचा समावेश आहे.