संतोष देशमुख हत्या प्रकरण : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती ;मुख्यमंत्र्यांची माहिती

Ujjwal Nikam । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबतच अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/CkHIgGNneF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती Ujjwal Nikam ।
उज्जवल निकम यांची निवड करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
मागच्या दोन दिवसापासून मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन Ujjwal Nikam ।
कालपासून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमूख आणि मस्साजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर, “बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.” अशी माहिती दिली आहे. मागच्या काही काळापासून निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड करावी अशी मागणी करण्यात येत होती. हीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली असल्याचे दिसत आहे.





