Ujani Dam Water : उजनीच्या पाणीसाठ्यात किंचीत वाढ; दहा दिवसांत १० टक्के पाणीसाठा वाढला
Updated On:

Ujani Dam Water – सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात यंदाच्या दमदार पावसामुळे दहा दिवसांत दहा टक्के पाणीसाठा वधारला आहे. सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह भीमा खोऱ्यात पाऊस मंदावला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुदैवाने पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. ७ जूनपासून गेल्या १० दिवसांत धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रविवारी धरणात एकूण पाणीसाठा ३७.४३ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा वजा २६.२४ टक्के होता.
तर पाणीसाठ्याची टक्केवारी वजा ४८.९८ टक्के होती. भीमा खोऱ्यातून धरणात येऊन मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग आठ हजार क्युसेकवरून कमी होऊन आता केवळ ३२४८ क्युसेकपर्यंत झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १४८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे.





