UGC NET Certificate : यूजीसी नेट जून 2024 परीक्षेचे सर्टिफिकेट जाहीर; ‘या’ प्रकारे करा डाउनलोड

मुंबई : UGC NET जून 2024 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET जून 2024 परीक्षेचे प्रमाणपत्र जारी केले आहे. UGC NET जून परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती, तर त्याचा निकाल 27 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता. हे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे जाणून घेऊया…
‘या’ प्रकारे करा सर्टिफिकेट डाउनलोड
सर्वप्रथम यूजीसी नेटच्या अधिकृत ugcnet.nta.ac.in वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर होम पेजवर उपलब्ध UGC NET जून 2024 प्रमाणपत्र लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
यानंतर उमेदवारानी त्या ठिकाणी आपले लॉगिन डिटेल्स भरावे.
यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
सबमिट झाल्यावर तुमचे सर्टिफिकेट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
यानंतर प्रमाणपत्र तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
तसेच जर कोणत्याही उमेदवाराला प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही [email protected] किंवा [email protected] ईमेल करू शकता.
UGC NET डिसेंबर सिटी स्लिप जारी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET डिसेंबर 2024 परीक्षेची सिटी इन्फॉर्मेशन स्लिप देखील जारी केली आहे, जी वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही परीक्षा सिटी स्लिप केवळ 3 जानेवारी 2025 च्या परीक्षेसाठी जारी करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in ला भेट देऊ शकता.





