Udhayanidhi Stalin : तामिळनाडू विधानसभेत पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. राज्यातील टीव्हीके सरकारला बहुसंख्य जनतेचा पाठिंबा नसल्याचा दावा करत, त्यांनी सरकारला मिळालेल्या जनमताच्या आकडेवारीवर बोट ठेवले. उदयनिधी (Udhayanidhi Stalin) म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ४.९३ कोटी मतदारांपैकी केवळ १.७२ कोटी लोकांनी टीव्हीकेला मतदान केले आहे. म्हणजेच ३.२१ कोटी मतदारांनी सरकारला नाकारले असून सुमारे ६५ टक्के जनतेचा पाठिंबा सत्ताधारी पक्षाला नाही, हे विसरून चालणार नाही, अशी टीका त्यांनी केली. निवडणुकीदरम्यान ज्या अण्णा द्रमुक पक्षाला भ्रष्ट शक्ती म्हणून हिणवले, त्याच पक्षाच्या बंडखोर गटाचा आणि एनडीए घटक पक्ष असलेल्या एएमएमके आमदाराचा पाठिंबा घेतल्याबद्दल उदयनिधी (Udhayanidhi Stalin) यांनी सरकारला धारेवर धरले. Udhayanidhi Stalin। सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही वैचारिक शत्रूंशी आणि भ्रष्ट शक्तींशी हातमिळवणी केली, हेच का तुमचे स्वच्छ सरकार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच एएमएमके आमदाराच्या पाठिंब्यावरून त्यांनी घोडेबाजार झाल्याचा आरोपही केला. मागील सरकारने सुरु केलेल्या योजना सुरुच ठेवाव्यात असा आग्रही त्यांनी यावेळी केला.