Sanjay Shirsat : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. याचे कारण विधानपरिषदेतीन नऊ आमदारांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने त्यांना आज निरोप दिला जाणार आहे. या नऊ आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असा खोचक सल्ला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) विधानपरिषदेचे सदस्यत्व स्विकारले, ते मुख्यमंत्री पदासाठी स्विकारलं होतं. कारण दोन्ही पैकी एका सभागृहाचा सदस्य असणं गरजेचं होतं. अधिवेशन काळात ते यायचे प्रेस घ्यायचे आणि जायचे. त्यांनी इतरांना संधी द्यावी, असे देखील शिरसाट म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाबाद्दल संजय शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या. Sanjay Shirsat हेही वाचा : Prajakta Mali: १५ दिवसांच्या डिजिटल डिटॉक्सनंतर प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस कमबॅक; ‘Real Me’ म्हणत चाहत्यांना सरप्राइज मे महिन्यात विधानपरिषदेचे नऊ सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. रिक्त झालेल्या जागेवर निवडणुक होणार आहे. महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. याविषयी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, हे त्यांचे क्षेत्र नाही. त्यांचे क्षेत्र संघटन आहे. संघटनेमध्ये त्यांनी काम केले पाहिजे, मी त्यांनी डिवचण्यासाठी किंवा चिडवण्यासाठी बोलत नाही. त्यांचा पक्ष बांधणी हा त्यांचा प्रमुख उद्धेश असला पाहिजे. Sanjay Shirsat Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेतील शेवटचा दिवस; संजय शिरसाट यांचा खोचक सल्ला म्हणाले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी नाट्यमय घडामोडी घडल्या. ज्याची चर्चा राज्यभरात झाली आणि पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटल्याचे पाहायला मिळाले. शिंदे सेनेचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे चौकशी केली जाणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी कडक कारवाई आदेश दिले आहेत. मात्र, उपसभापतींच्या निर्णयाला सभापतींनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, सभापती किंवा उपसभापतींनी घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबंजावणीचे काम सरकारचे असते. मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि तो सभापतींना कळवायचा आहे. सभापतींनी स्थगिती दिलेली नाही. Sanjay Shirsat हेही वाचा : Fruits At Night: रात्री ही ‘५’ फळं फळ खाणं ठरू शकतं धोकादायक! वाढू शकतं वजन आणि ब्लड शुगर