Uddhav Thackeray : राज ठाकरेंसोबत युती करणार? उद्धव ठाकरेंनी अखेर दसरा मेळाव्यातून केलं जाहीर…

Uddhav Thackeray | Raj Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईमध्ये भर पावसात पार पडला, या मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दसरा मेळाव्यामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट सावाल करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार का? यावर देखील भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर ५ जुलै रोजी एकत्र आल्याचे आणि एकत्रच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मराठी भाषेवर हिंदीची सक्ती करण्यास तीव्र विरोध दर्शवण्यात आला. प्रत्येक भाषेला जसा प्रांत मिळाला, तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. जर मुंबई व्यापाऱ्यांच्या ताब्यात जात असेल, तर खिसा फाडून मुंबईचे रक्षण केले जाईल, असे सांगण्यात आले.
राज ठाकरे मेळाव्यात येणार का किंवा उद्धव ठाकरे जाणार का, या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या. “तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिंमत असेल तर हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार नाही,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला. शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या शिकवणीचा उल्लेख करत, कोणाच्या अंगावर जायचे नाही, पण कोणी अंगावर हात उचलल्यास तो हात जागेवर ठेवायचा नाही, असेही नमूद करण्यात आले.
दरम्यान यावेळी बोलताना भाजप हा अमिबा असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे, अमिबाला कसलाही आकार नसतो तो कसाही वेडा वाकडा असतो, मात्र तो एक पेशीय जीव आहे. तसंच भाजपचं झालं आहे, भाजप हा कसाही जिकडे जागा भेटेल तिकडे वेडा वाकडा वाढत आहे, मात्र एक पेशीय मी म्हणेल तेच खरं आसा टोला यावेळी ठाकरे यांनी लगावला आहे.





