‘काही लोक पांचट जोक मारत आहेत, पण…’, उद्धव ठाकरेंच्या बिनशर्ट पाठिंब्याच्या टीकेनंतर मनसेच सडेतोड उत्तर

Uddhav Thackeray । शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून नुकताच मुंबईत षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटासह मनसेवर सडकून टीका केली.
हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्या मुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 20, 2024
उद्धव ठाकरे म्हणाले की,लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही”, अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केली होती.
यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे. ‘हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्या मुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही. असं म्हणत सडेतोड उत्तर दिल आहे.





