सुधीर साळवींवर उद्धव ठाकरेंनी दाखवला विश्वास; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Sudhir Salvi | मुंबईच्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी मुंबई महानगर पालिकेच्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. लालबाग परिसर हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे सुधीर साळवी यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या या जबाबदारीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत सुधीर साळवी हे शिवडीतून लढण्यासाठी इच्छूक असताना उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना संधी दिली होती. त्यावेळी सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी लालबागमधील त्यांच्या कार्यालयासमोर शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे साळवी हे विधानसभेला वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा होती. परंतु, मातोश्रीवर बोलावून सुधीर साळवी यांची समजूत काढण्यात आली होती.
कोण आहेत सुधीर साळवी ? Sudhir Salvi |
सुधीर साळवी हे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 20 वर्षे मानद सचिव आहेत. महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स हॅास्पिटलचे विश्वस्त म्हणून देखील सुधीर साळवी कार्यरत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवी यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. याशिवाय सुधीर साळवी यांच्यावर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुक नियोजनाची जबाबदारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सुधीर साळवी यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. Sudhir Salvi |
हेह वाचा:





