Balasaheb Thackeray Video : ‘मी आणि शरद पवार महाराष्ट्रात एकत्र असतो तर…’; बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ Video व्हायरल

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्वच राजकीय पक्ष अगदी जोमाने आज प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सभा, दौरे, रोड शो, बैठकांबरोबरच सोशल मीडियावरही सर्वच पक्षांचा डिजीटल प्रचार जोरात सुरु आहे. यंदाची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. यादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मी आणि शरद पवार ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर…
कोणाची टाप नव्हती ह्या महाराष्ट्राकडे वाकड बघण्याची! pic.twitter.com/QbdNF4j45L— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 17, 2024
‘तो’ व्हिडिओ व्हायरल
बाळासाहेबांनी एका जाहीर सभेमध्ये काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली तर मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेन, असं म्हटलं होतं. हेच वाक्य मागील पाच वर्षांमध्ये अनेकदा चर्चेत आल्याचं किंवा ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करण्यासाठी वापरलं गेलं. मात्र आता बाळासाहेबांनी अन्य एका जाहीर भाषणामध्ये शरद पवारांबद्दल केलेले वक्तव्य व्हायरल होताना दिसत आहे.
काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे?
“मी आणि शरद पवार ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती ह्या महाराष्ट्राकडे वाकड बघण्याची!” असं बाळासाहेबांनी थेट बोट दाखवत विधान केलं होतं. हाच व्हिडीओ बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.





