“उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ संस्कृती विरुद्ध विकृती” ; उद्धव ठाकरेंचे सर्वांना आवाहन

Uddhav Thackeray on Maharashtra Bandh। बदलापूर प्रकरणावरून राज्यात सर्वत्र सध्या संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणाचा निषेध म्हणून उद्या विरोधी पक्षाकडून बंद पुकारण्यात आला आहे. याच बंदविषयी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याविषयी बोलताना त्यांनी उद्याचा संप हा संस्कृतीविरुद्ध विकृती असा असल्याचे म्हटले आहे.
संपविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी,”राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे. आम्ही विकृतीचे विरोधक आहोत. कोणत्याही राजकीय पक्षांचा नाही तर सर्व नागरिकांच्यावतीने उद्याचा बंद आम्ही करत आहे. सर्व भेद विसरून उद्या बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केले आहे. सरकारला काहीही म्हणून देत मी जनतेच्या बाजूने आहे. जनतेला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. यंत्रणा वेळेत हलली असती तर हा उद्रेक झाला नसता. आता उच्च न्यायालयाने काल थोबडवलं तेही राजकारणाने प्रेरित होतं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
“दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा” Uddhav Thackeray on Maharashtra Bandh।
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले,”उद्याचा बंद हा महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद विकृती विरोधी संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहे का? याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. उद्याचा बंद महाविकास आघाडीतर्फेच नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांना या बंदात सहभागी व्हा, तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
“उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका” Uddhav Thackeray on Maharashtra Bandh।
तसेच हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे, पोलीस महासंचालिका यांनी लाडकी बहीण व्हावे ,मध्ये येऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवी, पोलिसांनी दादागिरी करू नका. सरकार अकार्यक्षम असलं तरी जनतेला सक्षम व्हावे लागते. उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, नाही तर जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे
दरम्यन , या बंदच्या माध्यमातून आम्ही बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत अशी मागणी करतो. नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे. आजही अटक सुरू आहे दरोडेखोरांना आणतात तसे आणले,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.





